संपादक-१९९३ - लेख सूची

पत्रव्यवहार

मा. संपादक, आजचा सुधारक, नागपूर. स.न.वि.वि. आजचा सुधारक मध्ये आपण लिहिलेले विवेकवादावरील लेख, माझ्या पत्रांना व इतरही व्यक्तींच्या (उदा. दाभोलकर) प्रतिक्रियांना आपण दिलेली उत्तरे यांमुळे माझे समाधान झाले नाही. म्हणून पुन्हा हा पत्र लिहिण्याचा उपद्व्याप करीत आहे. १. विवेकवाद्यांच्या मतानुसार “विश्वाचे ज्ञान मिळवण्याचे वैज्ञानिक पद्धतीहून अन्य साधन मानवाजवळ नाही असा विज्ञानाचा दावा आहे.” (आजचा सुधारकनोव्हेंबर …

पत्रव्यवहार

श्री. प्र. ब. कुळकर्णी यांसी स.न.वि.वि. ऑगस्ट १९९३ (आजचा सुधारक) च्या अंकात ‘रक्तपहाट’ ह्या पुस्तकावरील आपले परीक्षण वाचले. ह्यांतील काही उद्धरणे खालीलप्रमाणे आहेत: तळवलकर म्हणतात, ‘पं. नेहरू वेगळ्या त-हेने (रीतीने) तत्त्वभ्रान्त होते. धर्माच्या प्रेरणेचा प्रभाव पाकिस्तान अव्यवहार्य ठरविण्यासाठी विचारात घेतला नाही. लोकसंख्येची पद्धतशीर अदलाबदल झाली असती तर जिनांना आणखी चार कोटी मुसलमानांचा भार सहन करावा …

चर्चा

श्री. मा. श्री. रिसबूड यांना उत्तर स.न. आपले दि. १५-७ चे पत्र आणि आपले पुस्तक ‘फलज्योतिष दोन्ही मिळाली. त्याबद्दल आभारी आहे. आधी आपल्या पत्राला उत्तर देतो, मग आपल्या पुस्तकातील ‘बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये या परिशिष्टाविषयी लिहितो. प्रथम विवेकवाद्याच्या तोंडी आपण जो युक्तिवाद घातला आहे त्यात थोडी दुरुस्ती सुचवितो. आपण म्हणता की ‘सृष्टीचे आदिकारण म्हणजे …

पत्रव्यवहार

प्रा. दि.य. देशपांडे यांस, स.न. आपले दि. ३ मार्चचे पत्र पोचले. त्यापूर्वीच एक आठवडा आजचा सुधारकच्या जास्तीच्या प्रती मिळाल्या होत्या व मी त्या काही निवडक मंडळींना माझ्या पत्रासह पाठविल्याही होत्या. सोबत त्या पत्राची प्रत आपणास माहितीसाठी पाठवीत आहे. त्यांपैकी दोघांचा (नरेन तांबे व ललिता गंडभीर) वर्गणी पाठवीत असल्याबद्दल फोन आला. (एकाचे ‘माझा आजकाल अशा लेखनाचा …

निसर्ग आणि मानव – परिसंवाद

निसर्ग आणि मानव – परिसंवाद साधना साप्ताहिकाच्या १८ जुलै १९९२ च्या अंकात श्री. ना. ग. गोरे यांचा ‘निसर्ग आणि मानव हा लेख प्रसिद्ध झाला. त्यात गांधीवादी पर्यावरणविचाराविषयी काही प्रतिकूल मते व्यक्त केली होती. त्या लेखाला २९ ऑगस्ट ९२ च्या साधनेत श्री वसंत पळशीकर यांनी उत्तर दिले. या उत्तराला मी साधनेत (नोव्हेंबर ९२) दिलेले उत्तर आजचा …

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ३)

विधानांचे समर्थन तत्त्वज्ञानाच्या दोन प्रमुख कार्यापैकी पहिले कार्य म्हणजे विधानांचे समर्थन करण्याच्या प्रक्रियेची चिकित्सा. आपल्यासमोर येणार्याक कोणत्याही विधानाविषयी ते खरे आहे कशावरून?’ हा पहिला प्रश्न आपल्या मनात उद्भवतो. या प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे त्या विधानाचे समर्थन करणे. एखाद्या विधानाचे समर्थन द्यायचे म्हणजे ते अन्य एका किंवा अनेक विधानांवरून अपरिहार्यपणे निष्पन्न होते असे दाखविणे. ती अन्य …

चर्चा- डॉ. के. रा. जोशी यांना उत्तर

डॉ. के. रा. जोशी यांच्या मूळ आक्षेपांना दिलेले माझे उत्तर त्यांना पटलेले नाही. आणि त्यांनी अनेक आक्षेप घेणारा एक लेख पाठविला आहे. त्याला यथामति उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. त्यांचा पहिला आक्षेप असा आहे मी कांट आणि उपयोगितावाद यांची सांगड घालण्याच्या केलेल्या प्रयत्नावर. ते म्हणतात की त्या दोन उपपत्ती तमःप्रकाशवत् परस्परविरुद्ध असून त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न …

संपादकीय

डॉ. रूपा कुळकर्णी ह्यांच्या धर्मान्तरामुळे श्रीमती दुर्गा भागवत ह्यांनी आमचे वर्गणीदार न राहण्याचे ठरविले आणि त्यांनी तसे आम्हाला कळविले. त्या निमित्ताने लिहिलेल्या आमच्या संपादकीयामध्ये (नोव्हें.-डिसें.९२) आमची जी इहवादविषयक भूमिका व्यक्त झाली आहे तिच्याबद्दल अधिक खुलासा मागणारी वा मतभेद व्यक्त करणारी जी पत्रे आली त्यांपैकी डॉ. आ.ह. साळुखे व श्रीमती सुनीता देशपांडे ह्यांची वेगळी नोंद घेऊ. …

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग २)

वाक्यांविषयीची वाक्ये गेल्या अंकात प्रसिद्ध झालेला या लेखमालेचा पहिला पाठ ज्यांनी वाचला असेल अशा वाचकांपैकी अनेक वाचकांचे त्याने समाधान होणार नाही. ते म्हणतील : ‘तत्त्वज्ञान म्हणून तुम्ही दुसरेच काहीतरी आमच्या गळी उतरवीत आहात. आम्हाला तत्त्वज्ञानाची फारशी माहिती नसेल, पण आम्हाला इतके नक्की माहीत आहे की तुम्ही सांगता ते तत्त्वज्ञान नव्हे. तत्त्वज्ञान म्हणजे दृश्य जगाच्या मागे …

पत्रव्यवहार

संपादक,आजचा सुधारक, स.न.वि.वि. प्रा. रूपा कुलकर्णी ह्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्याचे वाचले. त्यांचे अभिनंदनसुद्धा केले गेले. वास्तविकरीत्या आपण ज्या देशाचे नागरिक आहोत, त्या देशाच्या घटनेचे आणि इतर कायदेकानूंचे पालन केले की, ह्या पृथ्वीतलावर सुखाने जगण्यास ते पुरेसे आहे. भारताच्या घटनेनुसार धर्म ही ज्याची त्याची खाजगी बाब आहे. व्यक्ती कोणत्या धर्माची आहे, ह्याच्याशी शासनाला कर्तव्य नाही. सर्वच धर्म …